पुणे : राज्यात मराठवाडा व विदर्भातील तापमान पुढील काळात वाढतेच राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील तापमान सरासरीएवढे असून, पुढील आठवड्यातही ते तसेच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजस्तान व गुजरातमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मार्चच्या अखेरीस राज्यावर पडल्याने राज्यातील तापमानात वाढ झाली होती. हा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील तापमान पुन्हा सरासरीवर आले आहे. मात्र, उत्तर, पूर्व व पश्चिम भारतासह राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील तापमान पुढील काळात पुन्हा वाढणार अशल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यंदाचा उन्हाळा कडक असेल, असा इशाराही वेधशाळेने दिला आहे. मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी सध्या सरासरीपेक्षा एक अंशाने तापमान वाढलेले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत स्थिती अशीच राहील, असेही वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
पश्चिम हाराष्ट्र व कोकणातील अनेक ठिकाणी सध्या तापमान सरासरी एवढे आहे. पुढील आठवडाभर या तापमाात काहीही फरक पडणार नाही, असे नॅशनल क्लायमॅट सेंटरचे संचालक ए. के. श्रीवास्तव यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. विदर्भातील तापमानात बदल होत असतात. तसेच, ते पुढील काळात होतील. मात्र, विदर्भातील तापमानात काहीशी वाढ झाली, तरी त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात फारसा दिसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.