BREAKING: रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर

0

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग कनेक्शन आढळल्याने तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या आत्महत्येला त्यांच्या रियाला जबाबदार धरले होते. मात्र रिया ड्रग्स प्रकरणात अडकल्याने तिला अटक करण्यात आली होती. दरम्यान आज बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी मुंबई  उच्च न्यायालयाने रियाला दिलासा दिला आहे. रियाला जामीन मंजूर करण्यात आली आहे. रियासोबतच दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा याना देखील जामीन मंजूर झाला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला जामीन मिळालेली नाही.

रियाला एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आली आहे. रियाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईबाहेर कोठेही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कालच विशेष एनडीपीएस कोर्टाने रियाची न्यायालयीन कोठडी २० ऑक्टोंबरपर्यंत वाढविली होती. मात्र आज रियाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिली आहे.