रियाला धक्का: कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रगच्या अॅंगेलने एनसीबीने तपास केला. त्यातून ड्रग प्रकरणी मोठ-मोठे खुलासे झालेत. अनेकांचा यात कनेक्शन असल्याचे उघड झाले. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा देखील यात कनेक्शन आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान रिया चक्रवर्तीच्या जामिनासाठी तिच्या वकीलाने अर्ज केला होता, तो अर्ज मुंबई विशेष न्यायलयाने फेटाळला आहे. त्यामुळे रिया, शोविक चक्रवर्ती, अब्दुल बसित, झैद विलात्रा, दिपेश सावंत सॅम्युअल मिरांडा यांना कोठडी कायम राहणार आहे.

दरम्यान विशेष न्यायलयाने जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर रियाचं वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिया चक्रवर्तीला १४ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपर्यंतहे कोठडी आहे.

Copy