टेलिकॉम बाजारात खळबळ उडणार; रिलायन्सकडून मोठ्या घोषणा

0

नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समूहाची आज सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळविली. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची नवीन घोषणा केली आहे. यामुळे पुन्हा टेलिकॉम बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे.

Jio Fiber चा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, Jio होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे.

इंटरनेटचा वेग 1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने Postpaid Plus ही सेवाही लाँच केली आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत. याशिवाय जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे.
जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास त्यांना खूप काही मिळणार आहे. यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.

Copy