आ. राजूमामा भोळे कोरोनाबाधित, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

जळगाव – भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आ. भोळे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आ. भोळे म्हणाले की, अधिवेशनासाठी जायचे असल्याने कोरोना तपासणीसाठी नुमने दिले होते. त्यामध्ये कोरोना असल्याचे निष्पन्न झालेे. मात्र, त्यापूर्वी कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झालो आहे. उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन आ. भोळे यांनी केले आहे.

Copy