राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन

0

मुंबई- दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज पहाटे निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा यांच्या निधनाने कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर ही तीन मुले तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली असा परिवार आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत्या.