थोड्याच वेळात राहुल गांधी यांची शेतकरी रॅली

0

नवी दिल्ली – काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी आज मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करणार आहेत. थोड्याच वेळात ते पिपली मंडी येथे पोहोचतील. गेल्या वर्षी याच दिवशी शेतकरी आंदोलनात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना नमन करण्याच्या उद्देशाने राहुल यांच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ, दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, जोतिरादित्य सिंधिया, विवेक तनखा, माजी काँग्रेस अध्यक्ष सुरेश पचौरी, अरुण यादव, विरोधी पक्षनेते अजय सिंह आदी उपस्थित राहतील. नुकतेच राहुल यांनी ट्विट करून म्हटले होते, की ते ६ जूनला मंदसौर येथे एका रॅलीला संबोधित करताना देशातील कृषी विषयावर बोलतील.

Copy