राफेल करार:‘बोलो कुछ बोलो ना.’गाण्यावरून काँग्रेसने उडविली मोदींची खिल्ली

0

नवी दिल्ली- राफेल कराराबाबत सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक टीका करीत आहे. पंतप्रधानांनी याबाबत आपली प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी होत आहे मात्र पंतप्रधान याबाबत गप्प आहे. पंतप्रधान गप्प काआहे असा प्रश्न काँग्रेसकडून सातत्याने विचारला जातो आहे. अशात सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचे ‘बोलो कुछ बोलो ना..’ हे गाणे वापरून आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे गाणे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतपणे उभे आहेत, घाम टीपत आहेत.. पाणी पित आहेत अशा मुद्रा दाखवण्यात आल्या आहेत

राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरफार करून ते कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला मिळवून दिले असा आरोप काँग्रेसने केला आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या वक्तव्याचाही दाखला दिला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेच्या खिशातला पैसा काढून अनिल अंबानींचे खिसे भरले असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी चोरांचे सरदार आहेत असे म्हणत त्यांनी टीका केली. आता पुन्हा एकदा हरिहरनचे गाणे ट्विट करत काँग्रेसने मोदी विरोधी नारा दिला आहे. भाजपाकडून याला कसे उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Copy