पुणे मनपाचा अर्थसंकल्प जाहीर; कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विशेष तरतूद

पुणे : मागील वर्षभरापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे महानगर पालिकेनेही कोरोनासाठी विशेष तरतूद केली आहे. पुणे शहरातील आरोग्य विभागासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष देण्यात आले आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Copy