पुलवामा हल्लाच्या स्मृतीदिनी पुन्हा घातपाताचा कट

0

नवी दिल्ली: पुलवामामध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज रविवारी १४ फेब्रुवारी दोन वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी आज (रविवार) पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता. मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला. दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ मोठयाप्रमाणावर दडवून ठेवलेली ७ किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना माहिती देणार आहेत. यावेळी ते मागील काही दिवसांमध्ये अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची देखील माहिती देणार आहेत.

 

Copy