Private Advt

प्रा.दीपक दलाल यांनी स्वीकारला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार शुक्रवार दि.१७ डिसेंबर रोजी प्रा.दीपक दलाल यांनी प्रा.के.एफ. पवार यांच्या कडून स्वीकारला.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.के.एफ.पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे या
रिक्त झालेल्या पदावर प्रा. दीपक एस. दलाल यांची संचालक (अतिरिक्त कार्यभार) म्हणून प्रभारी कुलगुरु
प्रा.ई.वायुनंदन यांनी नियुक्ती केली आहे. प्रा.के.एफ.पवार यांनी प्रभारी संचालक म्हणून ३० जून रोजी पदभार स्वीकारला होता. प्रा. दीपक दलाल हे विद्यापीठाच्याच रसायन शास्त्र प्रशाळेत प्रोफेसर व ऑरगॅनिक केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना १६ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. प्रा.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
पातळीवर ५१ शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. ०३ संशोधन प्रकल्पदेखील त्यांचे सुरु असून विविध
समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे.

प्रा.दलाल यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.
आर.एल.शिंदे, प्र.वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, उपकुलसचिव ए.सी.मनोरे, के.सी.पाटील, डॉ.मुनाफ शेख, के.एन.गिरी, अरुण पाटील, एस.डी.बच्छाव, जी.एस.बोरसे, एम.आर.वाघ, उमवि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव भैय्यासाहेब पाटील, उमवि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अरुण सपकाळे आणि परीक्षा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.