मोदींचा शनिवारी पुणे दौरा; सीरमला देणार भेट

0

पुणे : संपूर्ण जगाला कोरोना लसीचे वेध लागले आहे. पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मितीचे काम सुरु केल्याने त्याकडे देखील लक्ष लागले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार २८ रोजी पुणे दौऱ्यावर येत असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढाव घेणार आहेत. मोदी यांच्या दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

शंभर देशांच्या राजदूतांच्या ४ डिसेंबर रोजी पुण्यातील “सीरम” इन्स्टिट्यूट भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर शनिवार (दि.२८ ) रोजी सीरमला भेट देऊन आढाव घेणार असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. गुरूवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी यांच्या दौऱ्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला.

 

Copy