अशी सुरु आहे इटलीत दीपिका-रणवीरच्या लग्नाची तयारी

0

मुंबई- सध्या बॉलीवूडमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. दोघेही १४ नोव्हेंबरला लग्न करणार आहे. अगदी दोन दिवसावर लग्न येऊन ठेपले आहे. काल शनिवारी दीप-वीर आपल्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी इटलीला रवाना झालेत. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीतील काहील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपवीरच्या फॅन्स पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/Bp-7EXMAvF7/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

हा फोटो लेक कोमोचा असल्याचा दावा केला जात आहे. काही लोक सजावटीचे काम करत आहेत. मागील महिन्यात २१ ऑक्टोबरला दीपिका व रणवीरने लग्नाची तारीख जाहिर केली होती. तेव्हापासून दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. १४ नोव्हेंबरला दोघेही साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर १५ तारखेना नॉर्थ इंडियन पद्धतीने हे लग्न होणार आहे.

काल रात्री दीपिका व रणवीर दोघेही लग्नासाठी इटलीला रवाना झाले. यावेळी दोघांच्याही चेहºयावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण याचदरम्यान रणवीरच्या अतिउत्साहात केलेल्या एका गोष्टीमुळे दीपिका काहीशी नाराज झालेली दिसली. मुंबई एअरपोर्टवर आधी रणवीर पोहोचला. पाठोपाठ दीपिका. दीपिकाला घ्यायला रणवीर समोर आला. यावेळी त्याने स्पीकरवर ‘मेहंदी लगा के रखना…’ गाणे प्ले केले होते. हे गाणे प्ले करत तो दीपिकाजवळ आला आणि त्याने तिला हॅलो म्हटले. पण रणवीरची हे वागणे कदाचित दीपिकाला आवडले नाही. तिच्या चेहºयावरची नाराजी कॅमेºयांनी लगेच टीपली. यानंतर दीपिका व रणवीर दोघेही वेगवेगळे पुढे निघाले.

Copy