आमदाराला जीवे मारण्याची धमकी; फडणवीसांनी सभागृहातच वाचले पत्र

मुंबई: भाजपचे अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकीचे पत्र दिले असून यात पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांना धमकी देण्यात आल्याचा मुद्दा माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. आमदार भारसाकळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याची पोलीस महासंचालकांमार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. यावर लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे हे माझ्याकडे आले तर त्यांची तक्रार समजून घेऊन योग्य ते आदेश देण्यात येतील असे सांगितले.

आमदार प्रकाश भारसाकळे यांना धमकीचे पत्र आले असून यात आमची ४० लोकांची गँग असून ५ कोटी रुपये द्यावे अन्यथा जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे.

Copy