नवीन माहिती: पूजा चव्हाणच्या मृत्यूचे कारण उघड

पुणे: सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले, या प्रकरणावरून विरोधकांनी  सरकारची कोंडी केल्याने अखेर मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ही प्रकरण शांत झालेले नाही. कालच पूजा चव्हाणच्या चुलत आजीने पूजाच्या आई वडीलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रूपये देऊन आवाज बंद धक्कादायक आरोप केला आहे. दरम्यान पूजा चव्हाणचा पोस्ट मार्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून मृत्यूचे नेमके कारण उघड झाले आहे.

पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाल्याचे उघड झाले आहे.

Copy