वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा; गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपा आक्रमक

मुंबई –  पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना आमदार व वनममंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुपूर्द केला आहे. दरम्यान, संजय राठोड यांनी पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत आपला राजीनामा स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपा आक्रमक

राठोड यांनी केवळ राजीनामा देऊन भागणार नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी फिर्याद दाखल झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी केली आहे. राजीनामा घेऊन हे प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करणार असेल, तर पुजा चव्हाण हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल. कोणत्या अधिकार्‍याने हे प्रकरण दाबले, त्याच्यावर काय कारवाई केली, राजीनामा घेऊन बोळवण केली जातेय का आदी प्रश्‍नही शेलार यांनी उपस्थित केले आहेत. राजीनामा दिला म्हणजे एफआयआर होत नाही हे समजून घेणे चूक आहे. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गुन्हा नोंदवून संजय राठोड यांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

Copy