कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनाही जिल्हाधिकार्‍यांकडून कारवाईची ‘पॉवर’

1

जळगाव – जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात जिल्ह्यातील 35 पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करीत कारवाईची ‘पॉवर’ दिली आहे.

नियुक्त अधिकार्‍यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्यास संबंधित व्यक्तीविरूद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 195 मधील प्रक्रियेस अनुसरून भादंवि 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचे कारवाई करायची आहे.

वाचा – #Covid Breaking; गेल्या वर्षीच्या स्थितीकडे जिल्ह्याची वाटचाल 

वाचा – कोरोना : खोट्या अविर्भावात राहू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा जळगावकरांना इशारा

 

Copy