पोलिस भरती परीक्षावेळी परीक्षा केंद्र परिसरात मनाई

 

धुळे : पोलिस भरती 2019 करीता रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी धुळे जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी 2,997 विद्यार्थी प्रवीष्ट असून परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12.30 दरम्यान असणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (2) नुसार मनाई आदेश लागू राहतील, असे तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, धुळे भाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. तसेच या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात झेरॉक्स, फॅक्स मशीन, लॅपटॉप, एसटीडी बूथ, मोबाईल फोनच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

केंद्राचे नाव व परीक्षा केंद्र क्रमांक
कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, 1701. जे. आर. सिटी हायस्कूल, धुळे, 1702. न्यू सिटी हायस्कूल, धुळे,1704, जिजामाता कन्या विद्यालय, धुळे, 1705. एसएसव्हीपीएस डॉ. पी. आर. घोगरे सायन्स कॉलेज,
धुळे,1708. एसएसव्हीपीएस आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज, धुळे, 1709. परीक्षा केंद्राचे 200 मीटर परिसरात
परीक्षार्थीशिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक
दुखापती/इजा होईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही. उपरोक्त परीक्षा केंद्राच्या 200 मीटर
परिसरातील झेराक्स, फॅक्स, इ- मेल, इंटरनेट सुविधा केंद्रे बंद राहतील. परीक्षार्थींना मोबाईल, पेजर, गणकयंत्र
आदींचा वापर सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही, असेही उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती
धोडमिसे यांनी म्हटले आहे.