पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांशी संवाद; नाविन्यपूर्ण प्रयोगाचा दिला मंत्र

0

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची आज २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. पंतप्रधान मोदी आज पूर्व भारतातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहे. शेतकरी सन्मान योजनेबाबतची माहिती आणि काही आठवणींना पंतप्रधान मोदी उजाळा देत आहे. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधत ते करत असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती जाणून घेतली तसेच देशाला शेतकऱ्यांचे अनुभव सांगण्याचे सांगितले. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मातुला गावातील गणेश भोसले या शेतकऱ्याशी मोदींनी संवाद साधला.

अनेकांकडून भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होतो आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

Copy