पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी लांडगे

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पाच विरुद्ध दहा मतांनी नितीन लांडगे विजयी झाले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज शुक्रवारी ५ मार्च रोजी झाली. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर यांनी देखील अर्ज दाखल केला होता. लांडगे यांना 10 तर भालेकर याना पाच मते पडली. स्थानिक आणि पक्षातील जेष्ठ नेते आणि आमदारांनी अन्याय केल्याने भाजपाचे निष्ठावान नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. निष्ठावान असतानाही पक्षाने अन्याय केल्याने राजीनामा देत आहेत, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली व्यक्त केली होती. त्यामुळे आज पार पडलेल्या निवडणुकीला नाराज भाजपचे स्थायी समिती सदस्य रवी लांडगे अनुपस्थित होते.

 

Copy