इंधन दरवाडीचे विघ्न कायम; आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली-देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाडीचा भडका सुरूच आहे. त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. दरम्यान आज देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी एक लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत.

प्रति लिटर डिझेलचा दर आज 78.53 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढल्यामुळे आज एक लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे.

Copy