दिलासादायक: पेट्रोल-डीझेल काही पैसे स्वस्त

0

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज सलग चौथ्या दिवशी कपात करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेला थोडासा का होईना, पण दिलासा मिळत आहे. आज मुंबईत पेट्रोल 25 पैशांनी , तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. घटलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 87.21 रुपये, तर डिझेलसाठी प्रतिलिटर 78.82 रुपये मोजावे लागतील. इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मात्र सलग चौथ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होत आहे.

दिल्लीतही पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहेत. दिल्लीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी 81.74 रुपये मोजावे लागणार आहेत, तर डिझेल प्रतिलिटर किंमत 75.19 एवढी आहे.

Copy