आजचा इतिहासातील काळा दिवस; १२ पक्षांकडून उपसभापतींविरोधात ‘अविश्वास’

0

नवी दिल्ली: केंद्र शासनाने तीन कृषी विषयक बिल लोकसभेनंतर राज्यसभेत मांडले होते. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही हे विधेयक पास झाले. मात्र तत्पूर्वी मोठा गदारोळ विरोधकांनी केला होता. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल असे सांगत विरोधी पक्षाने राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यसभा उपसभापती हरिवंश लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवे. मात्र या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहचवले आहे. यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.” असे अहमद पटेल यांनी सांगितले.

ज्या प्रकारे ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत ते लोकाशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. १२ विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. हे विधेयक पास झाल्याने शेतकऱ्यांची प्रगती होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

Copy