कृषी कायदे रद्दच्या मागणीसाठी विरोधक घेणार राष्ट्रपतींची भेट

0

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. दोन आठवड्यांपासून शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. सरकारसोबतची चर्चा फोल ठरल्याने शेतकरी आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्राने केलेल्या कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे. दरम्यान देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सीताराम येचुरी यांच्यासह इतरही नेते राष्ट्रपतींच्या भेटीला जाणार आहेत. दिल्ली सीमेवरील आंदोलन चिघळले आहे, यात राष्ट्रपतींनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Copy