पेट्रोलने नव्वदी गाठली; आज पुन्हा इंधन दरवाढ

0

मुंबई- सर्वसामान्यांना सध्या इंधन दरवाढीमुळे चिंतीत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागलं आहे. यासोबतच मुंबईत पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

आज झालेल्या इंधन दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.08 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 78.58 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 82.72 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 74.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. रविवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली होती.

Copy