आजही पेट्रोल-डीझेलच्या दरात घट; जाणून घ्या नवीन दर

0

नवी दिल्ली – मागील महिन्याभरापूर्वी इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली होती. इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सरकारबद्दल नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर ३२ पैसे तर डिझेलचे दर ३८ पैशांनी स्वस्त झाले आहेत. आजच्या नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलसाठी ७८.७९ रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी ७१.३२ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीतही पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ३६ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे राजधानीत प्रति लिटर पेट्रोलसाठी ७३.२४ रुपये, तर प्रति लिटर डिझेलसाठी ६८.१३ रुपये मोजावे लागणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. ६ ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी १८ ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

Copy