केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारला पदभार !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोदी सरकार 2 मध्ये पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे. आज नितीन गडकरी यांनी परिवहन आणि महामार्ग खात्या सोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचा देखील पदभार स्वीकारला. त्यांच्या सोबत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री म्हणून ओडीसातील मोदी म्हणून ओळख असलेले प्रताप चंद्र सारंगी यांनी पदभार स्वीकारला.

Copy