सुनील अरोरा बनले मुख्य निवडणूक आयुक्त: आज स्वीकारला पदभार !

0

नवी दिल्ली- १ डिसेंबर रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आज मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील आरोरा यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त निवडणूक आयुक्त आरोरा यांनी आज पदभार स्वीकारला आहे. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी सुनील अरोरा हे निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते. आज त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली.

अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

Copy