पेट्रोल-डीझेलच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा हा नवा फॉर्म्युला

0

मुंबई- इंधनाच्या वाढत्या दराने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार नवीन फॉर्म्युल्यावर विचार करीत आहे. भारत आणि इराण दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्याबाबत विचार केले जात आहे. भारत कच्च्या तेलाच्या खरेदीच्या बदल्यात इराणला तांदूळ आणि अन्य वस्तू देऊ देणार असल्याचे बोलले जात आहे असे झाल्यास इराण भारतला कमी किंमतीत कच्च्या तेलाची निर्यात करणार आहे. शकतो.

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. आज दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ६ पैशांनी वाढ होऊन ती ८२.७२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. डिझेलच्या किंमतीत १९ पैशांनी वाढ होऊन प्रति लिटर ७५.३८वर पोहोचले आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत ६ पैसे आणि डिझेल २० पैशांनी वाढले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ८८.१८ रुपये आणि डीझेल ७९.०२ वर पोहोचले आहे.

Copy