पेट्रोल-डिझेल पुन्हा भडकले

0

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढ होत असून पुन्हा एकदा दर वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसली आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लीटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 21 पैशांची वाढ करण्यात आली. मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलीटर 15 पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलीटर 23 पैशांनी वाढवण्यात आले होते.

बुधवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 15 पैशांनी वाढून 75.10 रुपये झाला. कोलकातामध्ये दर 77.79 रुपये, मुंबईमध्ये 82.94 रुपये आणि चेन्नईमध्ये 77.93 रुपये प्रति लीटरवर पोहोचला. बुधवारी दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमती 21 पैशांनी वाढून 66.57 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये दर 69.11 रुपये, मुंबईमध्ये 70.88 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.25 रुपये प्रति लीटर झाला आहे. रुपया पडल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 42 महिन्यांच्या सर्वात वरच्या स्तरावर पोहोचले आहे. WTI क्रूडचा दर 71 डॉलरच्या वर पोहोचला आहे. ब्रेंट क्रूडचा दर 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे.

Copy