राष्ट्रवादीची धाकधुक वाढली: भुजबळांमुळे सर्वोच्च नेत्यावर कॉरंटाईनची वेळ

0

नाशिक: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. 1 मार्चपासून राज्यात लॉकडाउन करण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. ागील आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होते. जळगाव दौर्‍यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी धाकधूक वाढली होती. यात आता आणखी मोठी भर पडली आहे. आता तर राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याच्या आरोग्याची काळजी निर्माण झाली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र राष्ट्रवादीत चिंतेची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार हे कालच आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हजर होते. शरद पवार आणि भुजबळ यांचा संपर्क आल्याने शरद पवार यांच्यावर कॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. खासदार शरद पवार यांचे वय पाहता चिंता वाढली आहे.

कालच्या विवाह सोहळ्याला शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी होते. नववधु आमदार सरोज अहिरे यांनाही कॉरंटाईन व्हावे लागणार आहे.

Copy