NCP प्रवेश: खडसे मुंबईला रवाना

0

जळगाव:  भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल भाजपला रामराम ठोकला आहे. उद्या शुक्रवारी २३ रोजी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान उद्याच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशासाठी एकनाथराव खडसे मुंबईला रवाना झाले आहे. मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने खडसे मुंबईला रवाना झाले आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे, कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या मुंबईला रवाना झाल्या आहेत. उद्या दुपारी २ वाजता त्यांचा प्रवेश होणार आहे.