पुण्यात महागाई विरोधात राष्ट्रवादीची होळी 

पुणे : मागील आठ वर्षापासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. तसेच सात महिन्यांपूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर होळी करण्यात आली. यावेळी ५० खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाई कमी होण्याची सुबुद्धी येऊ दे अशा घोषणा देखील देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, सतत होणार्‍या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे महागाई मधून बाहेर काढता येईल. याकडे सरकारचं लक्ष नाही. हे राज्यातील जनतेला माहिती असून जनता यांना चांगलाच धडा शिकविणार आहे.