भाजपला मोठा धक्का; सांगली मनपावर राष्ट्रवादीची सत्ता

0

सांगली : भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली महापालिकेतील सत्ता भाजपने गमावली आहे. महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांचीमहापौर पदाचे उमेदवार विजयी झाले आहे. भाजपचे ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली आहेत, उपमहापौर पदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात राजकीय समीकरण जुळून आले. त्यामुळे सत्ता बदल झाल्याचा दावा केला जात आहे.

सांगली महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक आहेत. त्यापैकी एक सदस्य मयत असल्याने ७७ सदस्यांनी मतदान केले. त्यात २ तटस्थ, दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर भाजपचे धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.