रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; ड्रग प्रकरणी एनसीबीची रियाची घरी धाड

0

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. तपासातून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ड्रग अँगलने देखील तपास सुरु आहे. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. सोमवारी दोन जणांना ताब्यात देहील घेण्यात आले आहे. या प्रकरणात तपासाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रमुख अभिनेत्री रिया चक्रवर्तीची देखील ड्रग अँगलने तपास करण्यात आला. दरम्यान आता रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे.

रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी आज शुक्रवारी (4 सप्टेंबर) NCB ने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीशी संबंधित ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते.

अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून रिया आणि तिच्या भावा शिवाय बॉलिवूडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावेही जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवूड पार्टीजमध्ये ड्रग्‍स घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावरही ड्रग्सचा वापर करणे आणि डिलिंग’ करण्याचा आरोप आहे.