‘पिंपरी-चिंचवड शहराला शिवनेरी जिल्हा असे नाव द्या’; महेश लांडगेंची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्याचे नामंतर करावे अशी मगणी वारंवार होत असताना आता भाजप नेत्यानं मोठी मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर बाजूला नेऊन त्याला शिवनेरी जिल्हा असे नाव देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महेश लांडगे म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहर मोठे होत असताना जिल्हा देखील मोठा झाला. त्यामुळे जिल्ह्याचं विभाजन करता आलं तर पिंपरी-चिंचवड शहर बाजूला नेऊन त्याला शिवनेरी जिल्हा, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.

महेश लांडगे यांच्या या मागणीनंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्या आमदार लांडगे हे अरबी समुद्र देखील पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्याची मागणी करतील. तर लोकप्रतिनिधीने कामांच्या बाबतीत कायम असमाधानी असायला हवं, त्याचे समाधान होईल तेव्हा काम संपलेल असेल, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.