मोदींनी घेतली युनोच्या महासचिवांची भेट; जागतिक प्रश्नावर चर्चा

0

ब्यूनस आयर्स। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्र महासचिव एंतोनियो गुतारेस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक स्तरावरील पाणी आणि वायु प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्याच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. दोन्ही नेते पाणी आणि वायू प्रदूषणाबाबत खूप गंभीर असून त्यावर चर्चा करण्यात आली आहे. येत्या काळात याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यात दोन वेळा दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊदी अरब येथील मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यात आर्थिक, सांस्कृतिक आणि ऊर्जा क्षेत्राबाबत चर्चा करण्यात आली.

Copy