VIDEO: नोटबंदी मजूर, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांवरील हल्ला: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: देशाचा विकास दर खूप खाली गेला आहे. त्यावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. २०१६ साली मोदींनी केलेली नोटबंदी त्यानंतर जीएसटीने देशाची अधोगती सुरु होण्यास सुरुवात झाल्याची टीका सातत्याने विरोधक करत आहेत. त्यात कोरोनामुळे अधिकच भर पडली. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामुळे देशाचा विकास दर खाली गेला. त्यावर आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा मोदींना लक्ष केले आहे. राहुल गांधींनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदींनी केलेली नोटबंदी मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर हल्ला होता. नोटबंदीमुळे काय फायदा झाला?. याचा उत्तर कोणाकडेही नाही. गरीब लोकांना नोटबंदीचा फायदा झाला नाही उलट अरबपती लोकांना त्याचा फायदा झाला असे आरोप राहुल गांधींनी केले.

“मोदीजींचा ‘कॅशलेस’ भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. जो फासा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम ३१ ऑगस्ट २०२० रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटित अर्थव्यवस्था तोडली,” अशी टीका राहुल गांधींनी केली. कॅशलेस व्यवहाराचा फटका लहान उद्योग, व्यापाराला बसला असे राहुल गांधींनी सांगितले.

असंघटीत व्यापार, उद्योगावर झालेला हा आक्रमण असून या आक्रमणाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे असेही राहुल गांधींनी सांगितले.