Private Advt

धक्कादायक ! शहरात दीडशेपैकी फक्त एकच मोबाइल टाॅवर अधिकृत

अनधिकृत माेबाइल टाॅवर अधिकृत करण्यासाठी लवकरण ठरणार धाेरण

 

 

जळगाव । महानगरपालिकेकडून एक धक्कादायक माहिती समोर अली आहे. ती म्हणजे जळगाव शहरात दीडशेपैकी एकच टाॅवर अधिकृत अाहे. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी डाेकेदुखी ठरलेल्या व कराच्या वसुलीअभावी उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या माेबाइल टाॅवर संदर्भात लवकरच धाेरण निश्चित केले जाणार अाहे. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत टाॅवर अधिकृत करताना त्यांच्याकडून अाकारण्यात येणाऱ्या करात सुसूत्रता अाणण्यात येणार अाहे. यासाठी राज्यस्तरावर समितीचे गठन करण्यात अाले असून अहवालानंतर निर्णय घेतला जाणार अाहे. दरम्यान

मनपा व नगरपरिषदांमध्ये माेबाइल टाॅवरवर अाकारण्यात येणारा प्राप्तिकर हा वेगवेगळा असल्याने प्राप्तिकर एकसमान व सुसूत्रीकरण करण्यासाठी तसेच राज्यातील अनधिकृत टाॅवर अधिकृत करण्यासाठी काय कार्यपद्धती असावी व किती कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी याबाबत समिती नेमली अाहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली धाेरण निश्चित केले जाणार. तत्पूर्वी मनपाने याबाबत माहिती संकलित केली.