मध्यरात्री चा पराक्रम…

ऑपरेशन कावेरी’ l  अंतर्गत भारतीय वायू दलाने एक अशक्य असणारं मिशन हाती घेऊन १२१ भारतीयांची अंतर्गत युद्धात पोळून निघणाऱ्या सुदान म्हणून सुखरूप सुटका केली आहे. गुरुवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाच्या ‘सी -१३० जे सुपर हर्क्युलस’ या विमानाने वाडी सेईडनं विमानतळा वर हा पराक्रम केला आहे. अनेक अर्थाने भारतीय वायू दलाच्या इतिहासातील सोनेरी अक्षराने कोरून ठेवावं असं हे ऑपरेशन पार पडलेलं आहे.

सुदान देश सध्या अंतर्गत कलहाने पोळून निघत आहे. सरकार आणि बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या कलहात तिथल्या सामान्य जनतेचं आयुष्य होरपळून निघालं आहे. यात अनेक भारतीय ही अडकलेले आहेत. याच भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी हाती घेतलेलं आहे. गुरुवारी रात्री वाडी सेईडनं विमानतळा वर अडकलेल्या १२१ भारतीयांना घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय वायू दलाच्या विमानाला खूप अडथळ्यांचा सामना करावा लागला. सगळ्यात मोठी अडचण होती ती धावपट्टी ची. वाडी सेईडनं इथली धावपट्टी कच्ची आणि त्याचा पृष्ठभाग अतिशय खराब होता. एअरस्ट्रिपमध्ये नेव्हिगेशनल ऍप्रोच एड्स किंवा इंधन भरण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धावपट्टीवर कोणतेही लँडिंग लाईट नव्हते. हे लँडिंग लाईट वैमानिकाला धावपट्टी ची अचूक जागा दाखवत असतात.

या सगळ्यात भरीस भर म्हणून भारतीय विमानाच्या पुढे असलेल्या तुर्कीच्या विमानावर फायरिंग झालेलं होतं. रात्रीच्या वेळी गोळ्यांच्या वर्षावात आणि कोणत्याही लाईट शिवाय अंधारात इतकं मोठं विमान उतरवणं आणि तिकडून अडकलेल्या लोकांना घेऊन पुन्हा उड्डाण करणं जवळपास अशक्य होतं. पण हार मानतील ते भारतीय सैनिक कुठले!! भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी कोणत्याही नेव्हिगेशन प्रणाली