#MeToo : विनता नंदा यांच्या विरोधात आलोक नाथ यांचा मानहानीचा दावा

0

मुंबई : बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरू झाल्यापासून एका पाठोपाठ एक दिग्गज व्यक्तींची नावं समोर येत आहेत. या यादीमध्ये बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेता आलोक नाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेत विनता नंदा यांच्याविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला आहे.

दरम्यान, आलोक नाथ यांनी तक्रार दाखल करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणीही केल्याचं सांगण्यात येत आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

Copy