#Me Too मोहिमेला आमिर खानचा सपत्नीक पाठिंबा: मुघल चित्रपट सोडले

0

मुंबई-सध्या बॉलीवूडमध्ये लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपांना उत आले आहे तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर आता बॉलीवूड मधील अनेक जण देखील त्यांना आलेले भयानक अनुभव शेअर करत आहेत. या मोहिमेला आता अभिनेता आमिर खान आणि आणि त्याची पत्नी किरण रावने देखील पाठिंबा दर्शवला आहे. आमिर खानने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाला कधीच पाठिंबा देणार नाही असे त्याने म्हटले आहे.

आमिर खान प्रॉडक्शनमध्ये या गोष्टींना किंवा असे करणाऱ्या लोकांना कधीच थारा देण्यात आलेला नाही. दोन आठवड्यापासून या मोहिमेद्वारे अनेक जण पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या प्रकरणात बॉलीवूड मधील काही मंडळींची नावे घेण्यात आली आहेत. त्यातील एका व्यक्तीसोबत आम्ही काम करायला सुरुवात करणार होतो. आम्ही त्याबाबत चौकशी केली असता आम्हाला कळले की, त्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार नाही.त्यामुळे मी माझ्या आगामी प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचे ठरवले आहे.

आमिरने या ट्विट मध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी या ट्विट द्वारे तो आपल्या मुघल चित्रपटाबाबत बोलत असल्याचे लगेचच लक्षात येतेय. कारण या चित्रपटाचा दिगदर्शक सुभाष कपूर असून अभिनेत्री गीतिका त्यागीने सुभाषवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील नोंदवली आहे.

आमिरच्या या ट्विटनंतर दिगदर्शक सुभाष कपूरने म्हटले आहे की, या प्रकरणाची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. माझी बाजू मांडण्याची मला संधी देखील देण्यात आलेली नाही. मुघल या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर भूषणने या प्रोजेक्टमधून सुभाषला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या ट्विटवरून तो आमच्या नव्हे तर केवळ दिगदर्शकाच्या विरोधात आहे हे तुम्हाला कळून येत आहे त्यामुळे यावर मी काहीही बोलू इच्छित नाही.

Copy