मराठा समाजाला 10% ईडब्लूएस आरक्षण

राज्य सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांना फायदा

मुंबई – महाराष्ट्रातील सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे, असा निर्णय घेतला आहे. सरळ सेवा भरतीमध्येही मराठा उमेदवार या आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने ईडब्लूएस आरक्षण देत मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू असताना या समाज घटकाला 10 टक्के ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घेता येत नव्हता.

ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे

  • ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • ईडब्ल्यूएस वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2019 मध्ये घेतला होता.
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत हे आरक्षण मिळू शकते. या आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी, असे या संदर्भातील कायदा सांगतो.