बलिया गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपीला अटक

0

बलिया: गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हाथरस बलात्कार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश चर्चेत असतांनाच बलिया गोळीबार प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान बलिया गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने लखनऊच्या जनेश्वर मिश्र पार्कमधून धीरेंद्रला आज रविवारी अटक केली आहे. घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्यावर ५० हजाराचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. बलियातल्या दुर्जनपूर गावात दोन गटांत सरकारी दुकान वाटपावरून झालेल्या वाद आणि भांडणानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला होता.

Copy