महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगडमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ

0

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे लसीकरण पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असताना पुन्हा एकदा काळजी वाढविणारी माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र (maharashtra), केरळ आणि छत्तीसगडमध्ये अलीकडे कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. चार राज्यातील ड्राय रनचे जे अहवाल प्राप्त झाले आहेत, त्या आधारे सुधारणा करण्यात आल्या आहेत. उद्या 33 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात ड्राय रन होणार आहे.

 

 

Copy