Maharashtra HSC Result 2023 : यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के, पुन्हा कोकणाची बाजी

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदा बारावी बोऱ्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

शरद गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल दुपारी जाहीर करणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थांचं अभिनंदन करतो. राज्यातील कॉपीमुक्त अभिनयानाची अंमलबजावणी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ८९.१४ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा ५ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

 

१२ वीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी :

 

कोकण- ९६.०१

पुणे -९३.३४

अमरावती- ९२.७५

कोल्हापूर- ९२.२८

छत्रपती संभाजीनगर- ९१.८५

नाशिक- ९१.६६

लातूर- ९०.३७

नागपूर- ९०.३५

मुंबई- ८८.१३

 

ऑनलाईन निकाल कसा पाहणार?

 

www.mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org