राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली कोरोना लस

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शुक्रवारी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेली होती. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली.

दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर, ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि रक्तदाब व इतर आजार असलेल्या रुग्णांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशभरात २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, ६.४४ लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 13 लाख 88 हजार 170 नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे. आतापर्यत 1 कोटी 80 लाख 5 हजार 503 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

कोरोना लसीकरणासाठी पहिल्याच दिवशी कोविन अॅपवर नोंदणीसाठी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने अॅपवरील नोंदणी बंद केली असून वेबसाईटवरच लसीकरणाची नोंदणी करावी, असे आवाहन जनतेला केलंय. http://cowin.gov.in या साईटवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

Copy