लॉकडाउन 2 ची सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लागला पहिला लॉकडाउन

0

अमरावती: कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात रुग्ण संख्या वाढू लागल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. दरम्यान अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकनंतर पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीत उद्या सोमवार संध्याकाळी ८ वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात आठवडाभरासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी ४ वाजता केली आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. अमरावतीसह यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा परदेशी स्ट्रेन असल्याचे बोलले जात होते. मात्र आरोग्य विभागाने हे वृत्त फेटाळून लावले होते.

पालकमंत्री यशोमती ठाकरू यांनी अमरावती शहरात फिरून व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. वाढत असलेली रुग्णसंख्या ही शहराच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर लॉकडाउनची घोषणा केली.

Copy