मोदींचा पुन्हा ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

0

अयोध्या: अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. तब्बल २८ वर्षानंतर ते राम जन्मभूमीत आले आहेत. भूमिपूजन सोहळ्यात मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राम मंदिर होत आहे, हा संपूर्ण भारतवासियांसाठी सुवर्णक्षण आहे. शेकडो वर्षाची प्रतीक्षा आज संपली आहे असे मोदींनी सांगितले. ‘राम सबमे है राम सबके है’ असे सांगत मोदींनी पुन्हा ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला. राम मंदिर होत आहे हा केवळ एका धर्माचा विषय नसून सर्वधर्म समभाव आहे. करोडो भारतवासीयांची ही संघशक्ती आहे.

यावेळी मोदींनी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन देखील केले. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू रामाची ओळख आहे. आज कोरोनाच्या काळात मर्यादा ठेवणे आवश्यक असून ‘दो गज दुरी बहुत जरुरी, मास्क जरुरी’ असे सांगत या काळात मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.

https://wp.me/p8nmZI-S1s