LIVE…पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांची २०० धावांच्या भागीदारीकडे वाटचाल

0

राजकोट- भारत आणि वेस्ट इंडीज संघात आज पहिले कसोटे सामना खेळला जात आहे. आज उपाहारानंतरही पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांनी धावांची गती कायम राखली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही २०० धावांच्या भागीदारीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. भारताची धावसंख्या सध्या १७२ वर २ गडी बाद अशी आहे.

अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याच्यासह सलामीला आला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल पायचीत होऊन माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने सामन्याची सुत्र हाती घेतली. त्याने चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याने संघाला 23 षटकांत 1 बाद 121 धावांचा पल्ला गाठून दिला. उपहारापर्यंत या दोघांनी भारताला 1 बाद 133 धावांचा पल्ला गाठून दिला.